नेवासा – पीक विमा योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. बोगस अर्ज कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सदर योजना बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी बंधनकारक करण्यात येणार आहे. पीएम पीक विमा योजनेतील बोगसगिरी टाळण्यासाठी ई-पीक पाहणी बंधनकारक करण्यात यावी, अशी शिफारस राज्य समितीने केली आहे.

राज्य समितीने सरकारकडे शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा न देता त्यासाठी १०० रुपये शुल्क आकारावे, अशी मागणी केली आहे. तसेच फसवेगिरी करणाऱ्या लोकांवर तातडीने गुन्हा दाखल करावा जेणेकरून या प्रकरणाला आळा बसेल, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामात ६० टक्के आणि रब्बी हंगामात १५ टक्के पेरणी झाली आहे. त्यामुळे ई पीक पाहणी बंधनकारक केल्यास राज्यात एकूण किती पेरणी झाली याची सविस्तर माहिती मिळेल. त्यानुसार राज्य सरकार हे धोरण राबवू शकेल, असं कृषी विभागाने म्हंटलं आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.