नेवासा – विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा १५ जून रोजी होणार असून, ती पूर्वीप्रमाणेच पारंपरिक म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परीक्षेची तारीख गुरुवारी जाहीर करण्यात आली.
सेट परीक्षेची तारीख निश्चित करण्यासाठी सुकाणू समितीची बैठक झाली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि दोन विषय तज्ज्ञांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठक पार पडली. त्यात ४० वे सेट परीक्षेचे आयोजन १५ जून रोजी करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी सेट परीक्षा ४ मे रोजी घेण्यात येणार होती.

मात्र त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी लागली. आता जून महिन्यात परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम व अन्य माहिती लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
येत्या दहा दिवसांत पात्र उमेदवारांकडून सेट परीक्षेसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही परीक्षा पुणे विद्यापीठाकडून घेतली जाणार आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांची ही परीक्षा होणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.