नेवासा – मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी ज्ञान फाउंडेशन व पसायदान स्पोर्टस् क्लब त्यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य डे- नाईट क्रिकेटच्या महासंग्रामाची सुरुवात झालेली आहे तरी ज्ञान फाऊंडेशन व पसायदान स्पोर्टस् क्लबच्या वतीने सर्व खेळाडूंना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान केले आहे . ही स्पर्धा खेळण्यासाठी खेळाडूना ऑक्शन फॉर्म भरणे अनिवार्य आहे.तरी या भव्य महासंग्रामाचा कालावधी 25- फेब्रुवारी-2025 ते1 मार्च 2025 असा असेल. या स्पर्धेत 12 संघाची निवड केली जाणार आहे व 6 संघाना बक्षिसे देण्यात येणार आहे.

पहिले -1,00,000/- दुसरे- 71,000/- तिसरे- 51,000/- चौथे- 35,000/- पाचवे आणि सहावे- 15,000/- असे असतील. आपल्या नेवासाच्या होम ग्राउंड वर आयपीएल सारख्या स्पर्धेचा आनंद आपल्याला घेता येणार आहे तसेच प्रेक्षकांसाठी भव्य लकी ड्रॉ चे आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे या लकी – ड्रॉ साठी भव्य बक्षीसे देण्यात येणार आहे. या महासंग्रामात महिलांसाठी विशेष बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. या स्पर्धेचा सर्व स्पर्धकांनी प्रेक्षकांनी भरभरून आनंद घ्यावा.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.