ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
बाळासाहेब ठाकरे

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा शिवोत्सव मुंबई येथील बीकेसी मैदानावर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवाराला राज्यातील जनतेने भरघोस मतांच्या रूपाने आशिर्वाद दिला या विजयी उमेदवारांचा सत्कार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिकांसमोर केला.

यावेळी झालेल्या सत्कार समारंभात स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंघे – पाटील यांचा सत्कार उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केला याप्रसंगी शिवसेनेच्या जेष्ठनेत्या विधानसभेच्या उपसभापती डॉ. निलम गोहे, शिवसेनानेते रामदास कदम, आमदार संतोष बांगर, गजानन किर्तीकर, प्रताप सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे

यावेळी बोलतांना आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले की,”मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली. याचीच पोचपावती म्हणून जनतेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि महायुतीला भरघोस मतांच्या रूपाने आशिर्वाद दिलेला आहे. राज्यात महायुतीचा महाविजय झाला हा विजय आपणा सर्वांसाठी दैदिप्यमान असल्याचे गौरोद्गारही यावेळी आमदार लंघे यांनी बोलतांना काढले.

बाळासाहेब ठाकरे

याच विजयाचा शिवोत्सव स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबईतील बीकेसी मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे. या शिवोत्सवात माझ्यासह शिवसेनेच्या सर्व विजयी शिलेदारांचा सत्कार करण्यात आला. हा ऐतिहासिक क्षण माझ्यासाठी जीवनभर लक्षात राहणारा आहे असेही यावेळी लंघे म्हणाले. ज्या जनतेच्या आशिर्वादाने हा बहुमान मला मिळाला त्या नेवासकर जनतेचा मी शतशः आभारी आहे या ऐतिहासिक विजयी उत्सवाचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली त्यासाठी मी स्वतःलाच भाग्यवान समजतो असे आ.लंघे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेब ठाकरे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेब ठाकरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बाळासाहेब ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!