माळेवाडी दुमाला – नेवासा तालुक्याला वरदान ठरलेल्या स्वामी समर्थ शुगर अॅण्ड अॅग्रो इ. लि. महालक्ष्मीनगर, माळेवाडी दुमाला, ता नेवासा या साखर कारखान्याने उसाला प्रथम हप्ता प्रतिटन 2800 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. 31 डिसेंबर पर्यंत तुटलेल्या ऊसाचे बिल शेतकऱ्याच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. अशी माहिती स्वामी समर्थ शुगर अॅण्ड अॅग्रो इ.लि. कारखान्याचे चेअरमन मा. ना. श्री. विजय (बापू) शिवतारे साहेब यांनी दिली. तसेच चांगल्या दरासाठी केंद्र सरकारने साखरेची एम.एस.पी वाढवावी, अशी मागणीही केलेली आहे. तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. सौ. ममताताई शिवतारे-लांडे मॅडम म्हणाल्या कि, कारखान्याची यशस्वी चाचणी पूर्ण करून कारखाना सुरळीत चालू झालेला आहे.

त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील तसेच इतर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे. आमचे कारखान्याचे आज अखेर 41000 मे. टन गाळप झालेले असून आमचे 3,00,000 मे.टन गाळप करण्याचे उदिष्ट आहे. तसेच पुढील हंगामात कारखाना वेळेवर सुरु करून गाळप क्षमता 6 ते 7 हजार मे.टन प्रती दिवस करून 11 ते 12 लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिष्ट समोर ठेऊन उच्चांकी ऊस दर देणार आहोत. तसेच नेवासासह शेवगाव व गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या उसाला प्राधान्य देऊन न्याय देणार आहोत. त्याकरिता वरील तालुक्यातील शेतकऱ्यांनी गळीत हंगाम 2025-26 करिता जास्तीत जास्त नवीन ऊस लागवड करून तसेच खोडवा ऊसाच्या नोंदी लवकरात लवकर देऊन कारखान्यास सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.