नेवासा – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी व दहावीच्या परीक्षा या परीक्षा केंद्रातील केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व शिक्षकेतर – यंत्रणात बदल करून घेण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, या निर्णयामुळे शिक्षकांवरील विश्वास समाजामध्ये कमी होत आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अन्यथा परीक्षा प्रक्रिया व पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण समन्वय समिती व सर्व शैक्षणिक संघटनांनी राज्य मंडळाला पत्राद्वारे दिला आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या सहविचार सभेत त्यावर सकारात्मक चर्चा झाली असून, त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

कॉपीमुक्त अभियानात काही बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक तसेच परीक्षक यांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने शिक्षकांवर अविश्वास दाखविल्यासारखे दिसते. कॉपीमुक्त अभियानाबाबत शिक्षण विभागाने दिलेल्या दुसऱ्या सुचनेत, परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रावर प्रविष्ट होणार आहेत, त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. परंतु, याबाबत शिक्षकांच्या विविध संघटनांतून यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.