नेवासा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरखेड येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहनासाठी माननिय गावचे सरपंच श्री विनोद ढोकणे व उपसरपंच माननिय विलास उंदरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनिल लोंढे सर यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले प्रमुख पाहुण्यांनी देशभक्तीपर भाषण दिले भारत स्वातंत्रालयान बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचे, नेत्यांचे स्मरण करून त्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शाळेतील विद्यार्थानी भाषणे, देशभक्तीपर गीते, परेड सादर केली शाळेच्या शिक्षिका सौ. गायखे सविता यांनी भारताच्या उज्वल भविष्यासावी आपण देशाला आदर्श नागरिक होणे महत्वाचे आहे, असा संदेश आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना दिला.

प्रजासत्ताक दिनानिमिन्त शाळेत वत्कृत्व, समुहगीत, स्वर्थाचे आयोजन करण्यात आले होते शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुत्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. वरखेड येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव अतंर्गत कृषी महाविद्यालय सोनई येथील कार्यरत कृषिदुत गुणनिधी चव्हाण,शिवाजी तांदळे , वाबळे ओकार,तेजस अपसुंदे,चेतन ननावरे, प्रशांत भालके यांनी कृषिदिंडी चे आयोजन करून झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा व स्वच्छ भारत अभियान अश्या घोषणा देत गावभर कृषी दिंडी चे आयोजन करण्यात आले होते. यामधे उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सोनवणे प्रवीण, दातिर सोमनाथ, शिक्षिका गायकवाड अलका व केळी उत्पादन संघटनेचे अहील्यानगर जिल्हा अध्यक्ष माननिय श्री पुरूषोत्तम सर्जे, कडूबाळ गोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.