नेवासा – मुलाचा शोध लागण्यासाठी पोलिसांकडून शोध होत नसल्याबाबत व आर्थिक फसवणूक झाल्याबाबत न्याय मिळण्यासाठी गुलाब जयवंत बर्डे (रा.बोरगाव सुरेगाव गंगा) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी दिलेल्या
निवेदनात म्हटले आहे की, माझा मुलगा श्री दत्तात्रय गुलाब बर्डे वय 50 वर्षे हा सन 2018-2019 पासून बेपत्ता आहे माझ्या मुलाचा शोध लागावा म्हणून मी पोलिसांकडे वेळोवेळी तक्रार अर्ज दिलेले आहे माझ्या अर्जाचा मजकुरा बाबत कोणताही तपास होत नाही त्यामुळे मी दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी आपल्या कार्यालया कडे अर्ज दिलेला आहे त्याची पोहोच माझ्याकडे आहे.

त्या अर्जात मी माझ्या अर्जाचा विचार न झाल्यास व माझ्या मुलाचा शोध न लागल्यास दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी आपल्या कार्यालय पुढे मी अमरण उपोषण करणार असे अर्जात नमूद केलेला आहे परंतु काल सुट्टी असल्यामुळे आज दि 27/1/2025 रोजी उपोषणास बसत आहे अर्ज देऊन पंधरा दिवस झालेले आहे मला आपणाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर व तपास झालेला नाही त्यामुळे मी आज आपल्या कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसत आहे माझ्या मुलाचा तपास लागत नाही तोपर्यंत मी उपोषणास बसणार आहे त्यातून माझे जिवाचे काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी शासन जबाबदार असून आपणही जबाबदार राहणार आहात मी वेळोवेळी अर्ज देऊन थकून गेलो आहे आता माझा हा शेवटचा पर्याय आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.