नेवासा-प्रवरा नदीचं महात्म्य प्राचीन म्हणजे दोन-अडीच हजार वर्षापासून आहे. गाथासप्तशती, संत ज्ञानेश्वर यांचे साहित्य, वारकरी संप्रदाय, महानुभ संप्रदाय, दत्त संप्रदाय अशा विविध काळाच्या प्रवाहात प्रवरा-गोदावरीचं वर्णन येतं. नदी काठी- नागरिकांना शुद्ध पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी कायम तिचा उपयोग झाला.
‘अमृताचा थेंब पडला, त्या ठिकाणी ‘कुंभमेळा’ होतोय अशी आख्यायिका आहे. जिथे अमृताचे वाटप झाले ती प्रवरामाई आता दूषित झालेली आहे, रक्त मिश्रित, ड्रेनेजचे सांडपाणी, प्रवरेमधे मिश्रित झालेलं आहे व हेच अशुद्ध पाणी, नेवासा परिसरातील सर्व लोक पीत आहेत, सर्व धार्मिक स्थळांना त्या ठिकाणचे पाणी जाते भाविक कावडीने पाणी आणतात व तेच रक्त मिश्रित पाणी महादेवाचे पिंडीवर देवाला अभिषकासाठी पवित्र पाणी म्हणुन वापरतात. सर्वच कामासाठी अशुद्ध पाणी वापरले जाते. लोक प्रवरासंगम येथून पवित्र जल घरात घेऊन जातात व दहा दहा वीस वीस वर्ष ठेवतात ज्यावेळेस एखादा माणूस व्यक्ती शेवटच्या घटका मोजतो तेव्हा पवित्र जल त्याच्या मुखात टाकतात, मृत्यू समयीही मरणोन्मुख व्यक्तीच्या मुखात सुद्धा गाईच्या रक्त मिश्रित पाणी पाजले जाते, हे दुःखदायक आहे.

प्रवरेची अवस्था वाईट झाली आहे. औद्योगिक कचरा, रासायनिक दूषित सांडपाणी, शहरातील सांडपाणी, प्लाष्टिक कचरा, घरगुती कचरा, वाहत येणारे खत, कीटकनाशके, अवैध जनावर कत्तल करुण गटाराद्वारे येणारे पाणी प्रवरेत येत आहे.
वरील सर्व गोष्टींमुळे पाणी अशुद्ध झाले आहे आणि त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे, प्रवरेचं संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची आणि येथील प्रशासनाची जवाबदारी आहे.

प्रवरेत येणारे सर्व दूषित पाणी रोखणे गरजेचे आहे, प्रदूषण, प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा :1974, पर्यावरण संरक्षण कायदा :1986 अंतर्गत कठोर कायदे आहेत, मात्र असे असूनही प्रवरा धोकादायक वळनावर येऊन ठेपली असून नागरिकांचे आरोग्य आणि प्रवरेचं अस्तित्व धोक्यात आले आहे.
प्रवरेत दूषित पाणी सोडण्या-या सर्व खासगी संस्था, नागरीक, नगर परिषद आणि जे जे दूषित प्रवरेत दूषित पाणी सोडतात ते थांबवले पाहिजे प्रशासकीय उपाय केले पाहिजेत.
नागरिकांनी प्रवरा नदी शुद्धीकरण मोहिमेत सहभागी झालं पाहिजे. प्रवरा नदीच्या संरक्षणासाठी आपण सर्व एकत्र येणे आवश्यक आहे, नसता शुद्ध वाहणारी प्रवरा नदी, गटार वाहणारी, मैला वाहणारी नदी म्हणुन आपल्यासमोर वाहत राहणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.