नेवासा – जिल्हा परिषद शाळा दारुंटे मळा नेवासा खुर्द या ठिकाणी आज भारत गॅस ( रघुजन गॅस सर्विस नेवासा ) यांच्या वतीने गॅस सुरक्षा सप्ताह निमित्त महिलांना गॅस संदर्भात सुरक्षा कशी करायची, गॅसचा वापर कशाप्रकारे करायचा, याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या वतीने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिलांची गर्दी लक्षणिय होती. यावेळी शिक्षक श्री शरद जंगले सर, श्रीमती सुवर्णा बँड मॅडम, श्रीमती कावेरी शिंदे , रघुजन गॅसचे कर्मचारी प्रविण उगले व अजय शिंदे उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.