गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे सध्या शेतीसाठी सुरू असलेल्या रात्रीच्या विज पुरवठ्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. आता तर विज पुरवठा रात्री ९ वाजता सुरू होणार व पहाटे ५ वाजता च पुन्हा बंद होणार. बिबट्या,रानडुक्कर या सारख्या वन्य प्राण्यांचा सध्या मुक्त संचार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. भुकेमुळे व्याकुळ झालेले हे वन्यजीव बंदिस्त गोठ्यात प्रवेश करुन शेळ्या मेंढ्यांचा फडशा पाडत आहेत.

गेल्या आठवड्यात अर्जुन किसनदेव बेल्हेकर यांच्या बंदिस्त गोठ्यातील दोन शेळ्या तर राजेंद्र मिसाळ यांच्या छोट्या बखऱ्यांचा फडशा या बिबट्याने पाडला. त्यामुळे रात्री शेतीसाठी पाणी धरताना शेतकऱ्यांवर हल्ला झाला तर यास कोण जबाबदार राहणार वनविभाग कि विज वितरण कंपनी असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अनेक वेळा शेतीसाठी पाणी धरत असताना रानडुक्कर हल्ल्यात शेतकरी जखमी झाले आहेत. एक तास कमी परंतु दिवसा व पुर्ण दाबाने विज पुरवठा करण्याची मागणी होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.