ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पोलिस

नेवासा- अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा तालुक्यातील देवगडफाटा येथे महामार्गालगत पत्र्याच्या शेडमध्ये मृतदेह आढळून आला आहे. ही खळबळजनक घटना बुधवार २९ रोजी उघडकीस आली. घटनास्थळी नेवासा पोलिसांचे पथक हजर होऊन तपास सुरू केला आहे. सदर मृतदेह हा पुरुष असून वय अंदाजे ४० ते ४५ दरम्यान असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृतदेह

नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुक शिवारातील देवगड फाटा येथे महामार्गालगत एका शेतकऱ्याच्य शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती परिसरात कळताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर सदरील मालकी असलेल्या शेतकऱ्याने लगेचच पोलिसांत खबर दिल्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजफाटा घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मृतदेह
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मृतदेह
मृतदेह

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मृतदेह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!