नेवासा – वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा निमित्त श्रीज्ञानेश्वर महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्य ऐतिहासिक पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला. वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा निमित मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे डॉ. अण्णासाहेब शिंदे ग्रंथालय, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ, सावित्रीबाई फुले ठे पुणे पुणे विद्यापिठ, पुणे आणि व एनसीसी युनिट यांचे विद्यमाने, महाविद्यालयात ।’वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.

त्यानिमित महविद्यालयात पुस्तक परीक्षण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथालय विभागाच्या वतीने महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी यांना विविध पुस्तके वाचना करिता उपलब्ध करून देण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी भाग घेतला तसेच पुस्तक वाचन करून त्याचे परीक्षण जमा केले. यामधून उत्कृष्ट परीक्षणासाठी प्रमाणपत्र आणि पुस्तक देण्यात आले त्याचे वितरण २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.

विशेष म्हणजे वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा निमित महाविद्यालयात त्यामध्ये ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथालय मध्ये ३०० पेक्षा जास्त ऐतिहासिक कथा कादंबरी व ऐतिहासिक पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते. चार दिवस या प्रदर्शनास सर्वात जास्त प्रतिसाद देत शिक्षकेतर सेवक आणि अनेक विद्यार्थी यांनी ग्रंथप्रदर्शनास भेट दिली. या उपक्रमांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. बी. कल्हापुरे, उपप्राचार्य डॉ. ए. जे. घनवट यांनी यशस्वी नियोजन केले. या उपक्रमांमध्ये मराठी प्रमुख डॉ. एन. व्ही. मिसाळ, ग्रंथपाल पी. पी. कोकणे, प्रा. एन. के. आगळे, प्रा. वाय. बी. साळवे, डॉ. एस. एस. आगळे, प्रा. जी. एल. गारुळे, डॉ. के. व्ही. नांगरे, डॉ. रवी चव्हाण यांनी यासाठी सहकार्य केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.