नेवासा – परफेक्ट फाउंडेशन संचलित परफेक्ट अबॅकस क्लासेस नेवासा यांच्या वतीने नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशन स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अबॅकस कॉम्पिटीशन स्पर्धेत दीड हजार विद्यार्थ्यांना सहभाग घेतला होता.
नेवासा येथील औदुंबर चौकात असलेल्या हॉटेल प्रणाम च्या सभागृहात झालेल्या पारितोषिक समारंभ वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ.तेजश्रीताई विठ्ठलराव लंघे पाटील हया होत्या तर आदर्श शिक्षिका सौ.कौसल्या गायकवाड,अँड.अंजली काळे,सौ.सीमा निर्मळ,सौ.संपदा ससे,डॉ.निलेश लोखंडे, भाजपचे युवा नेते मनोजआण्णा पारखे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी आलेल्या मान्यवर अतिथींचे अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे गणितीय ज्ञान देणाऱ्या शिक्षिका व कार्यक्रमाच्या आयोजक सौ.प्रियंकाताई गायकवाड यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.प्रास्ताविकात त्यांनी अबॅकस संदर्भात विद्यार्थ्यांसह उपस्थित पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.अँबकस ज्ञानाबरोबरच वेदिक मॅथ हा विषय सुद्धा क्लासमध्ये शिकवला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अँबकस स्पर्धेत नेवासा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश संपादन केले.रिहानखान अल्ताफखान पठाण याने १६८ आणि प्रणय बाबासाहेब चामुटे याने १४८ गणिते पाच मिनिटात सोडून चॅम्पियन ट्रॉफी मिळवली. हर्षद अधिक म्हस्के याने प्रथम क्रमांक तर साक्षी महादेव नवले हिने दुसरा क्रमांक मिळवला. एकूण आठ विद्यार्थी टॉप टेन मध्ये आले तर २४ विद्यार्थ्यांना टारगेट कम्प्लीट केल्याबद्दल कॉन्सिलेशन ट्रॉफी मिळाली.

कु.स्नेहा विशाल म्हस्के हिस अबॅकस कोर्स पूर्ण केल्याबद्दल अबॅकस मास्टर ट्रॉफी देण्यात आली.परफेक्ट फाउंडेशनच्या संचालिका अश्विनी मोरे मॅडम यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी बोलतांना तेजश्रीताई लंघे पाटील म्हणाल्या की नेवासा शहर व तालुक्यातील मुलांना अबॅकसच्या शिकवणीमुळे भावी शैक्षणिक वाटचालीस मोठी मदत होणार आहे यासाठी अशा प्रकारचे शिक्षण व स्पर्धा झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनीअँबकस स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.सौ.संपदा दिवटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.शिक्षिका सौ.प्रियंकाताई गायकवाड व सौ. जयश्री म्हस्के यांनी या उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केले होते.उपस्थित पालकांनी कार्यक्रमानंतर त्यांना धन्यवाद देत आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.