नेवासा – लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने रेशन दुकानातून अन्न धान्याबरोबरच महिलांना साडी वाटप करण्याची घोषणा केली होती. परंतु लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे साडी वाटप टप्प्याटप्याने करावे लागले होते. आता पुन्हा येणाऱ्या होळीच्या सणासाठी साडी वाटप करण्यात येणार असून राज्य शासनाने जिल्हा पुरवठा विभागाकडे लाभार्थ्यांची सख्या मागवली आहे.

दरम्यान, मागील वेळच्या साडीचा दर्जा सुमार असल्याने एकट्या नगर जिल्ह्यात अजून १० हजार साड्या पडून असून आता येणाऱ्या साड्या कशा असणार याकडे महिलांचे लक्ष राहणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने गतवर्षी वर्षातून एकदा महिलांना साडी वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार जिल्ह्यातील ८७ हजार ६५६ अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना योजनेचा लाभमिळत आहे. प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत दिली जात आहे. यंदा देखील होळींच्या सणाला साडीचे वाटप होणार आहे. – त्यासाठी सरकारने जिल्हा पुरवठा विभागाकडून लाभार्थी महिलांची तालुकानिहाय माहिती मागवली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.