माता रमाईंच्या त्यागामुळेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला मिळाली झळाळी – चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले मनोगत
नेवासा – नेवासा फाटा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात शुक्रवार (दि.७) रोजी सकाळी १० वाजता माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते अब्दुलभैय्या शेख,सरपंच दादा निपुंगे, सतिष कावरे,मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, रिपाईचे तालुकाध्यक्ष सुशिल धायजे,पप्पूभाऊ इंगळे, चळवळीचे जेष्ठनेते प्रा.सातुरे सर,बी.बी.पंडीत,पप्पुभाऊ कांबळे,पोलीस पाटील आदेश साठे,पञकार राजेंद्र वाघमारे,संजय बनसोडे,साईनाथ शिरसाठ,सनी पाटोळे आदी मान्यवर यावेळी प्रभृती उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एका भक्कम स्त्रीचा हात असल्याशिवाय ‘तो’ पुरूष कधीच यशाचा पल्ला गाठून भरारी घेऊ शकत नाही याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत.

जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेले होते तेव्हा रमाईंनी जे हाल सोसले त्याची तुलना केलीच जावू शकत नाही त्याच त्यागामुळे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाचा उद्धार केलेला आहे रमाईंच्या भक्कम पाठबळामुळे अाणि खंबीर साथीमुळे जगात डॉ.बाबासाहेबांच्या यशस्वी कार्य मोठ्या दिमाखात झळकत असल्याचे गौरोद्गारही यावेळी सातुरे सर यांनी बोलतांना केले. यावेळी रिपाईचे सुरेश गायकवाड,बी.बी. पंडीत,संजय बनसोडे यांची समोचित भाषणे झाली .यावेळी प्रमुख अतिथी आणि उपस्थित भिमसैनिकांनी माता रमाईच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले यावेळी वैभव मगर,संजय वाघमारे,संदिप साळवे, बाळासाहेब केदारे,भास्कराव लिहिणार,कांचण फलटणकर,सोमनाथ साठे,भाऊसाहेब जगदाळे,येडूभाऊ सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने भिमसैनिक उपस्थित होते माता रमाई जयंती कार्यक्रम यशस्वीतेसाठी रिपाईचे तालुकाध्यक्ष सुशिल धायजे,पप्पूभाऊ इंगळे,बाळासाहेब ठोंबरे,राजू इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.