गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे पुरातन हेमाडपंथी असलेल्या महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व संत तुकाराम महाराज कथा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.सकाळी निवृत्ती महाराज लांडे यांचे हस्ते ध्वज पुजन होऊन या सप्ताहास सुरुवात होईल. दि. २१ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या कार्यक्रमात पहाटे काकडा भजन , सकाळी ७ते ८ विष्णु सहस्र नाम, ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, ८.३० ते ११ संत तुकाराम महाराज कथा. आळंदी देवाची येथील ह. भ. प. शंकर महाराज डोईफोडे यांचे सुमधुर वाणीतून कथा होणार आहे. दि. २८ रोजी सकाळी गावातून ग्रंथ मिरवणूक होऊन ९ ते ११ शंकर महाराज डोईफोडे यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होईल. सप्ताहाचे यंदा १९ वे वर्ष असल्याचे महात्मा गांधी तंटामुक्ती चे अध्यक्ष व आयोजक ज्ञानदेव लोहकरे यांनी सांगितले. तरी परिसरातील भाविकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.