नेवासा – श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव ने येथे सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी १९ वा हप्ता वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर भागलपूर बिहार येथून ऑनलाईन प्रक्षेपण व्दारे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने ता.शेवगाव येथे दि.२४ फेब्रुवारी २०२ ५ रोजी दुपारी १.०० वाजता करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच कृषि शासकीय योजना, सद्य परिस्थिती पिक व्यवस्थापन व इतर विषयांवर केव्हीके च्या शास्त्रज्ञांच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतक-यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.