सोनई –वांजोळी ता नेवासा येथे गेल्या आठवड्यात झालेल्या जबरी चोरीमुळे दहशतीचे साम्राज्य आहे. शांताराम विठ्ठल दाणी यांच्या वस्तीवर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केली. या कुटुंबीयांची मा सभापती सौ .सुनिताताई शंकरराव गडाख यांनी आज भेट घेतली कुटुंबीयांची चौकशी करून धीर दिला या गंभीर गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी पोलिसांकडे गेली. याप्रसंगी दाणी कुटूंबातील सदस्य लक्ष्मण खंडागळे, विनोद सुद्रिक, शरद येळवंडे, किशोर येळवंडे, मंगेश पागीरे यांच्यासह माजी मंत्री शंकरराव गडाख मित्रमंडळाचे सदस्य उपस्थितीत होते.
वांजोळी येथे झालेल्या चोरीमुळें परिसरात व गावात भीतीचे सावट आहे. लवकरात लवकर या घटनेचा तपास व्हावा
– बद्रीनाथ खंडागळे, ग्रामस्थ


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.