नेवासा – नेवासा शहरातील ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसर आणि नेवासा फाटा येथील साईसिटी वसाहतीसमोर सोमवारी पहाटे चार – पाच हत्यारबंद चोरट्यांनी या परिसरात मोठा धुमाकूळ घालत काही बंगल्यांच्या प्रवेशव्दाराची मोडतोड करुन काही ठिकाणी चोरट्यांनी थेट बंगल्यात प्रवेश करुन घरातील सामानाची नासधुस केली चोरट्यांकडून ऐवज चोरीचा प्रयत्न फसला असला तरी चोरटे सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद झालेले असतांना याप्रकरणी झालेल्या चोऱ्यांची माहीती नेवासा पोलीसांना देवूनही पोलीस अतिक्रमाणाचा बंदोबस्त असल्याचे सांगून झालेल्या चोऱ्यांकडे साधे फिरकलेही नसल्यामुळे पोलीसांच्या कारभाराबाबत जनतेतून मोठा संताप व्यक्त करण्यात आला.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसरात दोन – तीन तर नेवासा फाटा येथील साईसिटी वसाहतीसमोर राहणाऱ्या कृष्णा लोंढे यांच्या बंगल्यात प्रवेश करण्यासाठी चोरटे हे लोंढे यांचे तारीचे कंपाऊड तोडून गेटचे कुलूप तोडत बंगल्यात प्रवेश केला माञ या बंगल्यातील आतमधला मुख्य दरवाजा चोरट्यांना सापडलेला नसल्यामुळे येथे चोरीचा प्रयत्न होवूनही फसला गेलेला असून हे चार – पाच चोरटे सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद झालेले आहेत माञ पोलीस दिवसभर इकडे फिरकले नसल्यामुळे नागरीरांतून पोलीसांच्या भूमिकेबाबत आश्चर्याबरोबरच चिडही व्यक्त केली जात आहे.याबाबत विजय भणगे आणि कृष्णा लोंढे यांच्या झालेल्या चोरीबाबत नेवासा पोलीसांनी पोलीस दप्तरी नोंद केली आहे माञ पोलीस घटनास्थळी आले नसल्यामुळे ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.