सोनई – बेलपिंपळगाव ता नेवासा येथे रवी दि 9 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता जय भवानी,जय शिवाजीच्या जय घोषात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण युवा नेते उदयन गडाख यांच्या हस्ते व हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती संपन्न झाली. याप्रसंगी बोलताना उदयन गडाख म्हणाले बेलपिंपळगावमधील तरुण मित्रांनी एकत्र येऊन उभा केलेला अश्वारूढ पुतळा हा गावाच्या एकोप्याची साक्ष देतो.

यापुढेही सर्वानी एकत्र राहून गावाचा एकोपा जपावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वानी आचरणात आणावे असे म्हणाले
सर्व शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या. पुतळा उभारणीच्या कामात सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले याबद्दल सरपंच कृष्णा शिंदे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. सूत्रसंचालन चंद्रशेखर गटकळ यांनी केले आ विठ्ठलराव लंघे,माजी आ भानुदास मुरकुटे,माजी आ बाळासाहेब मुरकुटे यांनीही या कार्यक्रमप्रसंगी भेटी दिल्या. याप्रसंगी बेलपिंपळगाव ,घोगरगाव व परिसरातील हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याने बेलपिंपळगावच्या वैभवात भर पडणार आहे..
– बाळासाहेब सरोदे, शिवप्रेमी बेलपिंपळगाव…


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.