गणेशवाडी – सध्या देशभरात गाजत असलेले शनी शिंगणापूर येथील अॅप घोटाळा, कर्मचारी भरती घोटाळा याच्यातील दोषींवर कारवाई कामी सोनई येथील सचिन प्रभाकर दरंदले यांनी नवी दिल्ली येथील सुप्रीम कोर्टात दि. 22 रोजी याचीका दाखल केली आहे. शनैश्वर देवस्थान मधील आॅनलाईन अॅप घोटाळा, क्यूआर कोड घोटाळा, पावती पुस्तक घोटाळा, बोगस कर्मचारी घोटाळा, देवस्थान मार्फत विविध संस्थांना दिलेली देणगी घोटाळा तसेच भाविकांनी दिलेली देणगी स्वरुपातील दागिने गहाळ झालेले प्रकरण इत्यादिंची ईडी व सिबिआय मार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच केंद्रीय कमिटी कडून मागील दहा वर्षाचे आॅडीट करण्यात यावे असे दाखल करण्यात आलेल्या याचीके मध्ये दरंदले यांनी म्हटले आहे.

विधानसभेत मुख्यमंत्री यांनी वाचुन दाखवलेले घोटाळे, धर्मदाय आयुक्तांनी पोलीस यंत्रणेला दिलेले चौकशी चे आदेश, त्याचप्रमाणे देवस्थान च्या उप कार्यकारी अधिकारी ने केलेली आत्महत्या असे अनेक विषय सध्या देवस्थान मध्ये गाजत आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा करून पोलीस ठाण्यात एफ आर आय नोंदवुन धर्मदाय आयुक्तांनी विश्वस्थांना नोटीसा देवुन दोन ते तीन महिन्यांचा कालावधी होऊन देखील कारवाई होत नसल्याने परीसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
मि सर्व शनी भक्तांना आव्हान करतो जर आपली देवस्थान, कर्मचारी, अधिकारी, इत्यादी कडून फसवणूक झाली असेल तर माझ्याशी संपर्क साधण्याचे आव्हान केले आहे.
-सचिन दरंदले, सोनई.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

