सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व त्रिमूर्ती कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,त्रिमूर्तीनगर नेवासा फाटा परिसर ,ता.नेवासा जि.अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने बहि:शाल विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन आज 24/9/2025 रोजी ज्येष्ठ प्रबोधनकार सुरेंद्र गुजराथी सर यांनी बाळू जोशी ला काय वाटते व प्रेमाच्या कविता या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन करून आजच्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले.
कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या सर्व अतिथींचे औक्षण करून करण्यात आली.त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन संपन्न झाले.त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत व परिचय प्रा. सोमनाथ खेडकर सर यांनी करून दिला तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला विभागाचे हेड प्रा.गोरख गुंड सर यांनी केले.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कॉलेजचे प्राचार्य डॉ. आरसुळे सर यांनी स्वीकारले. प्रमुख पाहुण्यांनी आजच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. विविध उदाहरणांच्या साहाय्याने मुलांना माहिती दिली .त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आरसुळे सर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोष जावळे सर व सूत्रसंचालन बहिःशाल केंद्रकार्यवाहक प्रा. राहुल बोरुडे यांनी केले. व कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. आजच्या कार्यक्रमासाठी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा स्नेहल घाडगे पाटील तसेच सर्व सीनियर कॉलेज समन्विका डॉ. अनुराधा गोरे मॅडम,N फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या डाॅ.अनाप मॅडम व सर्व शिक्षक वृंद ,सर्व विद्यार्थी उपस्थित होते. व कार्यक्रम अत्यंत उत्साही आनंदी वातावरणामध्ये पार पडला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

