
नेवासा: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या इराण-इस्त्राईल-अमेरिका युद्धामुळे राज्यातील जलोद्योगावर (बाटलीबंद पाणी) व्यापक परिणाम झाला आहे. या उद्योगासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालात दररोज दरवाढ होत आहे. एकीकडे युद्ध आणि दुसरीकडे वाढते उन्ह लक्षात घेता ऐन उन्हाळ्यात वितरक आणि ग्राहकांना याचा फटका बसणार आसल्याचे दिसत आहे.

या संदर्भात महाराष्ट्र बाटलीबंद पाणी उद्योग असोसिएशनकडून मिळालेल्या माहितीनुसार इराण इस्त्राईल अमेरिकात सुरू झालेल्या युध्दामुळे बॉटलबंद पाणी उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा पुरवठा कमी होत आहे. पॅकेजिंग साहित्य, तसेच वाहतूक खर्चामध्येही मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलची साठवणूक शक्य असल्याने पुढील दोन महिने पुरले एवढे इंधन उपलब्ध असल्याने सदर बाबींवर अद्याप प्रभाव जाणवत नसला तरी अन्य बाबींवर युध्दाचा परिणाम दिसत आहे.

यातच पाणी उद्योगात हा परिणाम दररोज आढळून येत असल्याने दररोज कच्च्या मालाच्या किमतींत वाढ होत आहे. सर्व प्रकारच्या पॉलीमर्सच्या किमती दररोज वाढत आहेत. वितरकांना कोणतीही ऑर्डर देण्यापूर्वी त्या दिवसाची मालाची किंमत तपासून ती अंतिम करून ऑर्डर देण्यास सांगण्यात येत आहे. कच्चा मालाच्या किमती वाढल्याने पॅकेज्ड ड्रिकींग वॉटरच्या उत्पादन खर्चातही वाढ झाली.

उत्पादन कमी होत आहे. राज्यासह जिल्ह्यातील अनेक उद्योजकांना ही दरवाढ परवडणारी नसल्याने अनेकांचे उद्योग ऐन उन्हाळ्यात बंद पडतील, अशी भीती निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात पाण्याच्या एका बॉक्सच्या किमतीत दहा रूपयांची वाढ झाली होती. तिच वाढ एका आठवड्यात १५ ते २५ रूपयांपर्यंत पोहोचली असल्याचे बाटली बंद पाणी उद्योग असोसिएशनचे सदस्य लखन आग्रवाल, कपिल आग्रवाल यांनी दिली.

अशी झाली कच्च्या मालाची दरवाढ
प्री फॉर्मचे दर ११५ वरून १७० रूपये किलो, कॅपमध्ये २० पैसे प्रति नगावरून ४५ पैसे प्रतिनग, लेबल ३०० रूपये प्रति किलोवरून ४३० रूपये प्रति किलो, पुठ्ठा बॉक्स ११ रूपये प्रति नगावरून १४ रूपये प्रतिनग, थिंक फिल्म ११८ रूपये प्रति किलोवरून १८० रूपये प्रतिकिलो तर चिकट टेपमध्ये २८० वरून ४०० रूपयांपर्यंतची वाढ झाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ५० जल उद्योग आहेत. यासाठी दररोज ५० लाख रुपयांपर्यंतच्या कच्चामालाचा पुरवठा होणे आवश्यक आहे. याकरिता एकच पुरवठादार आहे. दरवाढीमुळे मराठवाड्यासह राज्यातील १९ जिल्ह्यातील जलउद्योगांना संकटाचा सामना करावा लागणार आहे -अजय डौले -शिवांश इंडस्ट्री, नेवासा बुद्रुक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

