ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Food Poisoning

Ahmednagar Food Poisoning : 59 लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये सात बालकांचा समावेश आहे. 

अकोले तालुक्यातील मवेशी येथील (करबंदट्रा ) येथे हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून तब्बल १५० ते २०० हून अधिक लोकांना विषबाधा(Food Poisoning) झाल्याची घटना बुधवारी (ता. २८) रात्रीच्या सुमारास घडली. बाधित लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात बाधित लोकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घरात लग्नकार्य असल्याने अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथील एका कुटुंबात हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

मात्र, जेवण झाल्यावर अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास सुरु झाला. पाहता पाहता त्रास होणाऱ्यांची संख्या वाढली आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळे 59 लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात 7 लहान बालकांचा देखील समावेश आहे. सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नसून, विषबाधा झालेल्या सर्व लोकांवर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील रुग्णालयात पोहचले असल्याची माहिती मिळत आहे. 

माजी आमदार वैभवराव पिचड यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णांना मदत करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. अति गंभीर रुग्णांना तातडीने नाशिक, संगमनेर येथे हलविण्यात आले असून यात सात छोट्या बालकांचा समावेश आहे.

Food Poisoning

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Food Poisoning
Food Poisoning

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Food Poisoning
Share the Post:
error: Content is protected !!