भालगाव – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या दरवर्षी प्रमाणे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातून प्राथमिक शिक्षक या संवर्गातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव येथील तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षिका शितल झरेकर-आठरे यांना जाहीर झाला असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .
राज्यातील शाळांमध्ये उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या १०९ शिक्षकांना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोगाद्वारे शिक्षण देणाऱ्या कृतिशील शिक्षिका शितल झरेकर यांच्या नोकरीची सुरवात जिल्हा परिषद शाळा प्रवरासंगम येथे झाली. यानंतर भालगाव शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षिका त्यांचे कार्य राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे.

मिशन आपुलकी अंतर्गत भालगाव शाळेत लोकसहभागाद्वारे त्यांनी डिजिटल स्मार्ट क्लास नाविन्यपूर्ण तयार केला आहे. NCERT च्या एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती,PMeVidya चॅनलवर शैक्षणिक आशय प्रक्षेपणासाठी ई साहित्य निर्मिती, दीक्षा अँप समृद्धीसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. बालभारतीच्या आभासी वर्ग,एससीइआरटी च्या शिकू आनंदे उपक्रमात सुलभक म्हणून राज्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. तर बालभारती आयोजित एकात्मिक पाठयपुस्तक समीक्षण आणि निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत शिक्षक मार्गदर्शक कृतिपुस्तिका निर्मितीत सहभाग नोंदवला आहे. आनंददायी शनिवार अंतर्गत घेतलेले दोन्ही शाळेचे उपक्रम समग्र शिक्षा मुंबईच्या सोशल हॅण्डलवर झळकले असून आज अखेर त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत शासन पुरस्कृत संस्थांकडून राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावर विविध पुरस्कारांनी,फेलोशिप ने सन्मानित केले आहे.

राज्यातील शिक्षकांना दिशादर्शक जॉयफुल लर्निंग व आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग पद्धतीचे स्वतःच्या यु टयूब चॅनलवर आजअखेर स्वनिर्मित
३७२ शैक्षणिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत. आज अखेर त्यांचे विविध विद्यार्थी राष्ट्रीय व राज्यस्तरीय शैक्षणिक स्पर्धां, उपक्रमात विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश संपादित केले असल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर २२ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत हा पुरस्कार प्रदान साेहळा पार पडणार आहे. या वेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक मंत्री, शिक्षक आमदार आदी उपस्थित राहणार आहेत. एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून झरेकर यांचे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल पूर्व शिक्षण संचालक दिनकर टेमकर, सहसंचालक रमाकांत काठमोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, डायटचे प्राचार्य डॉ.राजेश बनकर,गटविकास अधिकारी संजय लखवाल, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,विस्तार अधिकारी रुकसाना शेख,केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद,मुख्याध्यापिका सरिता सावंत यांच्यासह राज्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

