ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Aanchal Tiwari
Aanchal Tiwari

Aanchal Tiwari Death : ‘पंचायत 2’ फेम अभिनेत्री आंचल तिवारीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात आणखी नऊ जणांनी आपला जीव गमावला आहे.

Aanchal Tiwari : ‘पंचायत’ (Panchayat) या सीरिजच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री आंचल तिवारीचा (Aanchal Tiwari) रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात आणखी नऊ जणांनी आपला जीव गमावला आहे. अभिनेत्रीसह भोजपुरी गायक छोटू पांडेचादेखील मृत्यू झाला आहे. अभिनेत्रीच्या निधनाने भोजपुरी इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. 

बिहारमधील (Bihar) कैमूर जिल्ह्यातील देवकली गावाजवळ 25 फेब्रुवारी 2024 रोजी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात लोकप्रिय अभिनेत्री आंचल तिवारीसह आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या नऊ जणांमध्ये भोजपुरी इंडस्ट्रीतील काही कलाकारांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. कलाकारांच्या मृत्यूनंतर भोजपुरी इंडस्ट्रीतून शोक व्यक्त केला जात आहे.

बिहारमधील देवकली गावाजवळ ट्रक, एसयूव्ही आणि मोटारसायकल यांची टक्कर झाली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. अनेक भोजपुरी कलाकारांचा यात समावेश आहे. दोन महिलांसह आठ लोक एका एसयूव्ही गाडीमधून प्रवास करत होते. यावेळी या गाडीला एका दुचाकीला धडकली. यानंतर,एसयूव्ही आणि दुचाकी रस्त्याच्या दुसऱ्या लेनमध्ये गेले, तेथे एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकासह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.  अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.या घटनेनंतर NH 2 वर ट्रॅफिक जाम झाले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी भभुवा येथील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पोस्टमॉर्टमनंतर पोलिसांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे.

आंचल तिवारी(Aanchal Tiwari ) भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती मुंबईतील तिलक नगर भागात राहायला होती. आंचल इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री होती. प्राईम व्हिडीओच्या गाजलेल्या ‘पंचायत’ या सीरिजमध्ये तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. या सीरिजमध्ये तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. भोजपुरी इंडस्ट्रीमध्येही आंचल चांगलीच अॅक्टिव्ह आहे. अनेक भोजपुरी गाण्यांना तिने आपला आवाज दिला आहे.

Aanchal Tiwari

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Aanchal Tiwari
Aanchal Tiwari

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Aanchal Tiwari
Share the Post:
error: Content is protected !!