ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

accident

Pune Accident : पुण्यातील कोंढवा परिसरात रात्रीच्या सुमारास भरधाव कारने दोन तरुणांना चिरडण्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Accident News : पुण्यातील अपघाताचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. कोंढवे गेट येथे रस्त्याच्या कडेने पायी जाणाऱ्या दोन तरुणांना भरधाव कारने चिरडलं. यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. ही घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मनिष नवनाथ तावरे (वय 17) आणि अजिंक्य केदार पाटील (वय 17) दोघेही कोंढवे येथील राहणारे आहेत. हे दोघे काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कोंढवा गेटे येथून रस्त्याच्या कडेने पायी जात होते. त्यावेळी अजिंक्य अरुण आघाडे (वय 36) या कार चालकाने भरधाव वेगाने कारने या दोघांना उडवले. ही धडक इतकी वेगाने होते की दोघेही काळी वेळ हवेत उडून लांबवर फेकले गेले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील अजिंक्य पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत गुन्हा दाखल करत कारचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मारुती ब्रिझा कार (एमएच 12 व्ही व्ही 4163) शिवणे येथील स्नेहा विहार सोसायटीमधून ताब्यात घेण्यात आली. आरोपी अजिंक्य पार्सल आणण्यासाठी हॉटेल अंजनी येथे गेला असता वाहन वेगाने चालवल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. अपघातानंतर 24 तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे.

accident

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

accident
accident

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

accident
Share the Post:
error: Content is protected !!