ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime News

Crime News : मित्रानेच मित्राचा काटा काढण्यासाठी सुपारी घेल्याचा व गाडीने उडवून देत मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर शहरात घडली. याबाबत विशाल शिवाजी घुसळे (रा. गवळीवाडा) यांनी फिर्याद दिली आहे. आदिल सय्यद, राकेश भोसले, तेजस सारवन, गणेश घाडगे, प्रशांत नामदे अशी आरोपींची नावे आहेत.
विशाल घुसळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी भिंगार येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. आमच्या गल्लीमध्ये गवळीवाडा येथे गणेश घाडगे, प्रशांत नामदे हे राहतात. 25 जानेवारी 2024 रोजी रात्री पावणेदोनच्या सुमारास सिद्धार्थ बाबासाहेब शिंदे याचे घरातून जेवण करून निघालो. त्यावेळी माझ्यासोबत गणेश घाडगे हा देखील तेथून निघाला होता.

भिंगार किल्ल्याजवळ येताच मला मंझा कुणीतरी पाठलाग करत आहे असे जाणवले. मी माझी गाडी जोरात पुढे आणली. ताठेमळा येथील संघर्ष चौकात आलो असता बलेनो या गाडीचा धक्का लागला. त्यात मी खाली पडलो व मला मार लागला. त्या गाडीतून प्रशांत नामदे हा खाली उतरायला लागला. परंतु मला पाहताच तो गाडीतून निघून गेला असे म्हटले आहे. दरम्यान आम्ही प्रेमदान हॉटेलचे सिसीटिव्ही फुटेज चेक केले असता, त्यात ही बलेनो गाडी पाठलागावर असल्याचे आढळले.

मला गणेश घाडगे यावर संशय आला कारण प्रशांत नामदे हा त्याचा मित्र आहे. आम्ही सिद्धार्थ बाबासाहेब शिंदे यांच्या घरचे फुटेज तपासले. त्यात गणेश घाडगे हा जेवण करताना मध्येच बाहेर आला व फोनवर बोलत होता की, सगळे कांड झाले ना तूम्ही मला फोन करा माझ्या डोक्यात असा विचार होता की, कांड करून तूम्ही डायरेक्ट फरार व्हा… पुण्याला जा, पैसे लागले तर ऑनलाईन माघून घ्या, असे बोलताना आढळला. आणखी काही गोष्टी तपासल्या असता आदिल सय्यद, राकेश भोसले, तेजस सारवन, गणेश घाडगे, प्रशांत नामदे आदींनी मला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने सर्व आव रचला होता असे लक्षात येताच पोलिसांत धाव घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Crime News
Crime News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime News
Crime News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime News
Share the Post:
error: Content is protected !!