ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

crime
पेट्रोल

Ahmednagar Crime News : पिंपळगाव लांडगा येथे पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारल्याची धक्कादायक घटना  घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून दारुच्या नशेत पतीने हे कृत्य केले आहे.

Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या पिंपळगाव लांडगा येथे पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारल्याची धक्कादायक घटना  घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून दारुच्या नशेत पतीने हे कृत्य केले आहे. या कृत्यामुळे नगरसह (Ahmednagar Crime News) परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

सुनील लांडगे (Sunil Landge) असे आरोपी पतीचे नाव असून त्याने आपली पत्नी लीला आणि दोन मुलींना घरात कोंडले. त्यानंतर बाहेरून कुलूप लावून घरामध्ये पेट्रोल टाकत आग (Fire) लावून पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारले आहे. हा सर्व प्रकार सुनील याने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून केल्याची माहिती समोर आली आहे.

पत्नी आणि दोन मुलींचा होरपळून मृत्यू 

आग लागल्याची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी सुनील याच्या घराकडे धाव घेतली. मात्र घराला कुलूप लावलेले असल्यामुळे त्यांना काही मदत करता आली नाही आणि घरामध्ये कोंडून टाकलेल्या पत्नी आणि मुलींचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

पतीने दिली गुन्ह्याची कबुली 

दरम्यान, नगर तालुका पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेतलं आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सुनील याने केलेल्या कृत्याची लगेचच पोलिसांना कबुली दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. 

Crime

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime
Crime

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime
Share the Post:
error: Content is protected !!