ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरातील एका युवतीला लग्न मोडण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याची घटना चितळे रोड परिसरात घडली आहे .

Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरातील एका युवतीला लग्न मोडण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याची घटना चितळे रोड परिसरात घडली आहे . या घटनेप्रकरणी सदर युवतीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी दीपक चौरे विरुद्ध विनयभंग व इतर कलमखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तोफखाना पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तोफखाना परिसरात राहणारी युवती ही एका हॉस्पिटलमध्ये डाटा ऍन्ट्री ऑपरेटर म्हणुन नोकरी करत होती, त्यावेळी तेथे तिची दिपक गणेश चौरे (रा-शेंडी पोखर्डी) याच्यासोबत ओळख झाली होती. तो हॉस्पिटल येथे लॅब टेक्निशियन म्हणुन नोकरीस होता. हॉस्पिटल येथे डयुटी वर असताना दिपक चौरे याचे सोबत ओळख झाली व त्यानंतर त्यांच्यात मैत्री देखील झाली होती.

ड्युटी वर असताना आमचे एकमेकांशी बोलणे तसेच दुपारचे जेवण आम्ही एकत्र करत असायचे. मी डयुटीवर असताना मित्र मैत्रीणी सोबत फोटो काढले होते. सप्टेंबर महिन्यात माझे लग्न जमले होते. त्यामुळे मी दिपक चौरे याला तु माझ्या जवळ येवु नकोस, बोलत जावु नकोस माझे लग्न जमलेले आहे असे सांगितले होते. परंतु त्याला मी समजावुन सांगुन देखील तो मला म्हणायचा की, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु माझेशी लग्न कर असे म्हणुन माझ्याशी बळजबरीने बोलायचं प्रयत्न करत होता . तु माझी नाही झाली तर मी तुझे कोठेही लग्न होवु देणार नाही अशी धमकी दिली होती. (Ahmednagar Crime News)

लग्नाची तारीख जवळ आल्याने मी हॉस्पिटल येथील काम सोडले होते. दिपक चौरे याने माझा होणारा नवरा यास माझे व तीचे एक वर्षापासुन प्रेम आहे. तु कशाला आमच्यामध्ये पडतो तु तिचेशी लग्न करु नकोस असे मेसेज केले होते. दि. 27 रोजी दिल्लीगेट शनीमंदिर येथुन दर्शन करुन चौपाटी कारंजा येथे दत्त मंदीराजवळुन जात असताना मला पाठीमागुन कोणीतरी मला आवाज देऊन माझा हात धरून विनयभंग केला तसेच माझे लग्न जमले होते त्यांना मोबाईल करून धमकी देऊन लग्न मोडले आहे असे फिर्यादित म्हटले आहे.

Ahmednagar Crime News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Ahmednagar Crime News
Ahmednagar Crime News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Ahmednagar Crime News
Share the Post:
error: Content is protected !!