ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime news

Ahmednagar Crime News : पाथर्डी शहर व तालुक्यातील सुमारे सहा व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा ठकसेन पोलिसांनी गजाआड केला आहे.(Crime News)

Ahmednagar Crime News : पाथर्डी शहर व तालुक्यातील सुमारे सहा व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा ठकसेन पोलिसांनी गजाआड केला आहे.न्यायालयाने विनोद नेमीचंद शर्मा रा. दिलदपाटकर, वाराणसी, उत्तरप्रदेश याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.(Crime News) संशयित आरोपीने सांगितलेले नाव, त्याचे आधारकार्ड व बँकेचे खाते, असे सर्वज बोगस असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचे खरे नाव शोधुन काढणे, त्याने व्यापाऱ्याकडुन घतेलेला माल नेमका कुठे विक्री केला, त्याचे पैसे कुठे ठेवले आहेत, हे शोधुन काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. येथील एस. के फर्निचरचे मालक सुनिल कदम यांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. संशयीताच्या तांत्रीक माहितीवरुन पोलिस अमोल आव्हाड, राम सोनवणे, कृष्णा बडे,

निलेश गुंड यांनी राहाता येथुन विनोद शर्मा याला अटक करून त्याला येथील न्यायालयात न्यायाधीस अस्मिता बिराजदार यांच्यासमोर उभे केले असता, त्याला प्रथम एक दिवसाची व नंतर पुन्हा एक दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.व्यापारी सुनिल कदम यांच्या सोबत बाफना फर्निचर व अन्य काही व्यापाऱ्यांना शर्मा नाव सांगुन या ठगाने लुटले आहे. त्याने वापरलेले आधारकार्ड बनावट आहे.त्याने दिलेले चेक बँकेचे असले तरी बँकेत खाते उघडताना बनावट कागदपत्र दिल्याने हा ठग नेमका कुठला आहे. त्याचे खरे नाव काय आहे, हे शोधुन काढणे गरजेचे आहे. त्याने आणखी कुठे कुठे असले प्रकार केले आहेत का, याचा तपास घ्यावा लागेल.

फसवणारी टोळीची व्याप्ती मोठी असू शकते. घेतलेला माल नेमका कुठे विकला जातो. वाहने कोणती वापरली जातात. त्याला आणखी कितीजण साथीदार आहेत. पाथर्डीत फसवणुक करुन घेतलेला माल नेमका कुठे विकला,याचा तपास करुन लुटले गेलेल्या व्यापाऱ्यांना न्याय देता येईल का, याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिस तपास करीत आहेत. सुतावरुन स्वर्ग गाठण्याची जबाबदारी पोलिसांनी स्वीकारली आहे.

Crime News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime News
Crime News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime News
Share the Post:
error: Content is protected !!