Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत अनेक पतसंस्थेतील गैरप्रकार समोर आले. त्यात संपदा सारख्या पतसंस्थेचा निकालही लागला. दरम्यान अर्बन बँकेचे प्रकरणही सध्या राज्यात गाजत आहे.
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत अनेक पतसंस्थेतील गैरप्रकार समोर आले. त्यात संपदा सारख्या पतसंस्थेचा निकालही लागला. दरम्यान अर्बन बँकेचे प्रकरणही सध्या राज्यात गाजत आहे. याच दरम्यान पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील राजे शिवाजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील आर्थिक अपहार समोर आला.
त्यानंतर पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आझाद ठुबे, उपाध्यक्ष शमशुद्दीन हवालदार आणि कार्यकारी संचालक संभाजी भालेकर यांच्यासह १४ जणांवर पारनेर पोलिस ठाण्यात दि. २९ जुलै रोजी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सदर प्रकरणाचा तपास आता पारनेर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक एस. एन. शिंदे यांनी फिर्यादी बाळासाहेब वाळुंज यांच्यासह इतर ठेवीदारांना पुरवणी जबाबासाठी आज (दि. २८) अहमदनगर येथे बोलावले आहे.
आरोपींवर महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा अंतर्गत (एमपीडीए) व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधीची फिर्याद बाळासाहेब तुकाराम वाळुंज (वय ६०, रा. काकणेवाडी) यांच्यासह सहा ठेवीदारांनी दिली आहे. पारनेर पोलिसांनी अपहार प्रकरणी या पतसंस्थेची चौकशी सुरू केली होती. परंतु, आझाद ठुबे वगळता इतर १३ जण फरार आहेत. आता हे प्रकरण पारनेर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे या तपासात अधिक गती येईल अशी अपेक्षा ठेवीदारांना आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.