ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Ahmednagar News

Ahmednagar News : नीलेश लंके यांच्या सलग दोन पोस्टमध्ये त्यांनी ‘घड्याळ’ चिन्ह वापरलेले नाही.

Ahmednagar News : आमदार नीलेश लंके गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकांच्या केंद्रस्थानी आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटात सामील झालेले लंके हळूहळू ‘तुतारी’कडे वळू लागले आहेत. आमदार लंके यांच्या सोशल मीडियावर घड्याळ चिन्हाचा वापर कमी होत चालला आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार लंके हातात तुतारी घेणार की नाही? याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार नीलेश लंके हे शरद पवार यांच्या संपर्कात आहे. तसे दोघेही जाहीरपणे समोरासमोर आले.(Ahmednagar News)

समोरासमोर येऊन देखील एकमेकांनी पक्ष प्रवेशावर भाष्य केले नाही. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील उपस्थित होती. यानिमित्ताने आमदार लंकेंना ‘तुतारी’ भेट देण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आमदार नीलेश लंके हे शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याचे संकेत दिले होते. यावर आमदार लंकेंनी दोन्ही बाजूने सावध पवित्रा घेत अजूनही जाहीर केलेले नाही. त्यामुळे आमदार लंकेंच्या शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाबाबत आणि नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत संभ्रम कायम आहे.

असे असले, तरी आमदार लंके (Nilesh Lankhe) यांनी सोशल मीडियावर ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर कमी केला आहे. ‘एक्स’ खात्यावरील डीपी फोटो आमदार लंकेंचा आहे. त्यावर मात्र ‘घड्याळ’ चिन्ह दिसते. दिनविशेषच्या निमित्ताने ते खात्यावर करत असलेल्या पोस्टवरील स्ट्रीपमध्ये नावासह ‘घड्याळ’ चिन्ह वापरायचे. मात्र गेल्या दोन पोस्टमध्ये त्यांनी ‘घड्याळ’ चिन्ह वापरलेले नाही..(Ahmednagar News)

यातच शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यावेळी विजयाची तुतारी वाजणारच असा दावा केला आहे. हा दावा करताना त्यांचा रोख आमदार नीलेश लंकेंच्या उमेदवारीकडे होता. ‘आमदार लंके हे तुतारी हातात घेतील की नाही, यावर मी भाष्य करणार नाही. तसे करून त्यांना अडचणीत आणणार नाही. परंतु यावेळी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विजयाची तुतारी वाजणारच आहे. आम्ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ जिंकल्याशिवाय गप्प बसणार नाही’, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

Ahmednagar News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Ahmednagar News
Ahmednagar News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Ahmednagar News

Share the Post:
error: Content is protected !!