ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Ahmednagar News

Ahmednagar News : नाशिक जिल्ह्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. दि. २८ फेब्रुवारीला दुपारी हा प्रकार घडला.या प्रकरणी शुक्रवारी (दि.०१) रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी घुलेवाडी येथील एका मुलाविरोधात गुन्हा नोंदवून घेतला.स्वामी रमेश तामचीकर (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. अल्पवयीन मुलीला संगमनेर बसस्थानकात सोडवतो, असे म्हणत त्याने मुलीला दुचाकीवर बसविले.

तिला बसस्थानकात घेऊन न जाता, तळेगाव येथील जंगलात घेऊन गेला. तेथे त्याने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला मारून टाकीन, अशी धमकीही दिली.घडला प्रकार मुलीच्या आईला समजल्यानंतर ती नाशिक जिल्ह्यातील एका गावातून संगमनेरात आली, त्यानंतर ती मुलीसमवेत पोलिस ठाण्यात पोहोचली. त्यानंतर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये (पोक्सो) हा गुन्हा दाखल झाला आहे.

Ahmednagar News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Ahmednagar News
Ahmednagar News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Ahmednagar News
Share the Post:
error: Content is protected !!