ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Ahmednagar News
Ahmednagar News

Ahmednagar News : नगर मनमाड रोडवरील साई मिडास टच येथील पंजाब नॅशनल हाऊसिंग फायनान्स व स्वास्तिक नेत्रालय येथे शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली.

Ahmednagar News : नगर मनमाड रोडवरील साई मिडास टच येथील पंजाब नॅशनल हाऊसिंग फायनान्स व स्वास्तिक नेत्रालय येथे शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची बातमी समोर येत आहे . तर स्वास्तिक नेत्रालय हॉस्पिटलमध्ये रुग्ण अडकल्याची माहिती प्रथमदर्शी माहिती समोर येत आहे.या दवाखान्यातील रुग्णांना परिश्रम घेऊन बाहेर काढण्यात येत आहे. ही आग विझवण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ही आग सकाळी सव्वानऊच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची माहिती देण्यात आली असून ॲम्बुलन्स आणि काही डॉक्टरची टीम सुद्धा या ठिकाणी तातडीने पोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चौधरी हॉस्पिटल आणि पंजाब नॅशनल हाऊसिंग सोसायटी इथे झालेल्या या शॉर्टसर्किटमुळे शेजारीच असणाऱ्या चंदूकाका सराफ आणि इतर दुकानांना मोठ्या प्रमाणत आग लागून नुकसान झालं असल्याची माहिती मिळाली आहे.

Ahmednagar News
Ahmednagar News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Ahmednagar News
Ahmednagar News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Ahmednagar News
Share the Post:
error: Content is protected !!