ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर शहरातील मुख्य चौकात असणाऱ्या हॉटेल दिग्विजय समोर गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या दरम्यान नगरसेवक युवराज पठारे यांच्या छातीला गावठी कट्टा लावत गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला.(Ahmednagar News)

Ahmednagar News : पारनेर शहरात आज, गुरुवारी सकाळी नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र गावठी कट्ट्यातील गोळी कट्ट्यातच फसल्याने पठारे बचावले. पठारे यांच्या समवेत असलेल्या एकाने गोळीबार करणाऱ्याच्या हातातील कट्टा हिसकावून घेतला. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. पुढील गोळी झाडण्याच्या आधीच तेथील एकाने पिस्तूल हिसकवल्याने पुढील अनर्थ टळला.या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या घटनेला जुन्या वादाची किनार असल्याची चर्चा आहे. घटनेची माहिती समजताच युवराज पठारे समर्थकांनी पारनेर शहरात व पोलीस स्टेशन परिसरात गर्दी केली होती. आरोपी हा रांजणगाव मस्जिद येथील अल्पवयीन आहे. पारनेर शहरातील बसस्थानक परिसरात मुख्य चौकात गुरुवारी सकाळी सव्वादहा वाजता शिवसेना नगरसेवक युवराज पठारे हे आपल्या तीन ते चार मित्रांसह आले होते. रांजणगाव मस्जिद येथील अल्पवयीन तरुणाने हातात गावठी कट्टा व चाकू घेऊन पठारे यांच्या छातीला गावठी कट्टा लावला.(Ahmednagar News)

पारनेर शहरातील बसस्थानकालगत असलेल्या मुख्य चौकातील हॉटेल दिग्विजयमध्ये नगरसेवक पठारे त्यांच्या मित्रांसह चहा घेत होते. तेथे अल्पवयीन युवक गावठी कट्टा व चाकू घेऊन आला. त्याने युवराज पठारे यांच्या छातीवर गावठी कट्टा रोखला व गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी कट्ट्यातच अडकल्याने केवळ आवाज झाला. तेथे उपस्थित असलेले पठारे यांचे सहकारी भरत गट यांनी त्या युवकाच्या हातून कट्टा हिसकावून घेतला. त्याच्या समवेत असलेले दोन तरुण पळून गेल्याचे सांगितले जाते.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्या मुलाने आपण एकटेच आहोत, असे पोलिसांना सांगितले असले तरी पोलीस त्याबाबत खातरजमा करत आहेत. गोळीबाराच्या प्रयत्नाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यामागे जुने भांडत कारण असल्याचे चर्चा होत आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गुरुवारी सकाळी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर या घटनेने पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली. भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी त्यांचीच चौकशी केली. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके, राहुल शिंदे आदींसह अनेकांनी त्यांची विचारपूस केली आहे.

Ahmednagar News
Ahmednagar News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Ahmednagar News
Ahmednagar News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Ahmednagar News
Share the Post:
error: Content is protected !!