ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Ahmednagar

Ahmednagar News : दारूबंदी करण्यासाठी अनेक गावात विविध उपाययोजना होत असतात. परंतु आता अहमदनगर(Ahmednagar) जिल्ह्यातील एका गावाने एक वेगळाच निर्णय घेतला आहे.

Ahmednagar News : गावकऱ्यांसह कोणीही पाहुणा गावात दारू पिऊन आल्याचे आढळून आल्यास त्याची गावकऱ्यांकडून धुलाई करण्यात येईल, तसा ऐतिहासिक ठराव सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित अकोले तालुक्यातील इंदोरी ग्रामस्थांनी बहुमताने मंजूर केला आहे. सोमवारी गावकऱ्यांसह युक्क – गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रेत्यांना दारू विक्री न करण्याचे आवाहन केले. यानंतर दारू विकताना आढळून आल्यास गावकऱ्यांकडून मारहाण करून दुकान फोडून टाकू, असा इशारा दिला.

दरम्यान, दुपारनंतर इंदोरी गावात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून याची लेखी हमी व सह्या घेऊन इशारा दिला.इंदोरी ग्रामस्थांनी दारूबंदीचा ठराव मंजूर करून दारूच्या बाटल्या फोडल्या. या कारवाईत बेकायदेशीर दारू विक्रेता स्वतःच सहभागी झाला व त्याने दुकानातून दारूच्या बाटल्या काढून देत फोडू लागला.गावातील चारही बेकायदेशीर दारू विक्रेत्यांकडून गावकऱ्यांनी तसे स्वाक्षरीसह लिहून घेतले. गावकऱ्यांसह युक्कांनी कोणी दारू पिऊन आढळून आल्यास हात साफ करून पोलिस ठाण्यात पाठवण्याचा इशारा दिला.

अहमदनगर(Ahmednagar News) जिल्हयात अनेक गावात दारूबंदीसाठी प्रयत्न सुरु आहेत. अनेक ठिकाणी या प्रयत्नांना यश आले आहे. तर काही ठिकाणी मात्र अद्यापही चोरून अवैध धंदे सुरु आहेत. दरम्यान आता इंदोरी ग्रामस्थांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाची मात्र सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक ठिकाणी याचे कौतुकही करण्यात येत होते.

Ahmednagar

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Ahmednagar
Ahmednagar

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Ahmednagar
Share the Post:
error: Content is protected !!