ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Ahmednagar

Ahmednagar : मनोज जरांगे यांचे कधीकाळचे सहकारी असलेल्या महाराज बारसकर यांनी अचानक जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतली. अहमदनगरच्या (Ahmednagar) सावेडी ग्रामस्थांच्या वतीने अजय बारसकर यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 

Ahmednagar : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर मागील काही दिवसांपासून अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar)  यांच्याकडून आरोप होत आहे. सोमवारी देखील बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. असे असतानाच मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलणारे अजय बारसकर यांना त्यांच्याच गावातून विरोध होतांना पाहायला मिळत आहे. अहमदनगरच्या (Ahmednagar) सावेडी ग्रामस्थांच्या वतीने अजय बारसकर यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 

मनोज जरांगे यांचे कधीकाळचे सहकारी असलेल्या महाराज बारसकर यांनी अचानक जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतली. मनोज जरांगे यांचे आंतरवाली आमरण उपोषण सुरु असतानाच बारसकर यांच्याकडून त्यांना पाणी पिण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, जरांगे यांनी बारसकरांना व्यासपीठाच्या खाली व्हा असे सांगून तेथून काढून दिले. त्यानंतर बारसकरांनी जरांगे यांच्याविरोधात भूमिका घेतली. मागील काही दिवसांत सतत पत्रकार परिषदेतून त्यांनी जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मात्र, जरांगे यांच्यावर आरोप करणाऱ्या बारसकरांना त्यांच्या मुळगाव सावेडी विरोध होतांना पाहायला मिळत आहे. बारसकरांनी जरांगे यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने हा विरोध होत आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील सावेडी हे अजय महाराज बारसकरांचे मूळ गाव आहे. मात्र, त्यांच्या याच मूळगावातून त्यांना विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्याची सावेडी येथील गावकऱ्यांनी भूमिका घेतली आहे. गावकऱ्यांनी बारसकरांचा निषेध देखील केला आहे. तसेच, बारसकरांची भूमिका त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. त्यांच्या याच भूमिकेला सावेडी गावचा विरोध असल्याचा दावा देखील गावकरी करत आहेत. विशेष म्हणजे सावेडी येथील गावकऱ्यांनी ठराव घेत अजय महाराज बारसकरांचा निषेध केला आहे. सावेडीच्या विठ्ठल रुक्मणी मंदिरात हा ठराव घेण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. 

सावेडी येथील गावकऱ्यांनी ठराव घेत अजय महाराज बारसकरांचा निषेध असतानाच दुसरीकडे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा देखील दिला आहे. मागील पाच ते सहा महिन्यापासून सुरु असलेल्या जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. आम्ही स्वतः त्यांच्या आंदोलनात सहभागी नसलो तरी आम्ही त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांच्या भूमिकेला देखील आमचे समर्थन असल्याचं गावकऱ्यांनी म्हटले आहेत. विशेष म्हणजे बारसकरांच्या भुमिकेशी सावेडी गावाचा कोणताही संबध नसल्याचे देखील गावकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

Ahmednagar

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Ahmednagar
Ahmednagar

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Ahmednagar
Share the Post:
error: Content is protected !!