ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Manoj Jarange

मनोज जरांगे(Manoj Jarange) हा खोटा माणूस असून त्याने अनेकवेळा गुप्त मिटिंग घेतल्याचा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला आहे.मला मारून टाका पण याला जरांग्याला पाटील म्हणणार नाही..

एकीकडे राज्य सरकारने मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर दुसरीकडे मराठा संघटनेत फुट पडल्याचं दिसून येतंय. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे सोबती अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी जरांगे यांच्यावर अनेक आरोप करत टीका केलीय. जरांगे यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला असा आरोप त्यांनी केला. तसेच मी पाणी पाजायला गेलो असताना त्यांनी संत-फिंतगेले खड्ड्यात असं वक्तव्य केलं असंही त्यांनी सांगितल. 

मनोज जरांगे हे हेकेखोर असल्याचा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला. मी जरांगेंच्या (Manoj Jarange) प्रत्येक कृतीला साक्षी आहे , मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी काही करतोय मात्र बिलकुल नाही, मी कीर्तन करण्याचेही पैसे घेत नाही असं सांगत अनेक दिवसांपासून आपल्या मनात खदखद असल्याचं त्यांनी सांगितलं. 

अजय महाराज बारसकर म्हणाले की, “माझं काम हे सत्य सांगणं आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, तो मी सहन करणार नाही. जरांगे यांना लोकं पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो. मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने, मी मोठा होईन. म्हणून त्यांनी ते पाणी प्यायले नाहीत. संत फिंत गेले खड्यात असं ते म्हणाले. तिथून माझा वाद सुरु झाला.”

मनोज जरांगेची मुलगी म्हणते, माझ्या बापाच्या देव पाया पडेल. मुलांमध्ये इतका अंहकार? सांगा हा देवापेक्षा मोठा आहे का? हा माझ्यावर आरोप करतो सरकार आणि भुजबळ यांचा माणूस आहे. म्हणून माझा आणि कोणाचा संबंध नाही. आजपर्यंत एक ही पत्र सरकारला त्याने स्वतः दिलं नाही. रोज पलटी मारतो तो… सगळ्या मिटिंग कॅमेरावर करतो. याला घोडा लावतो त्याला घोडा लावतो, असं अजय महाराज म्हणाले.

मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदींसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे(Manoj Jarange) पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही. मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही. तो हेकेखोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहायचा. आमचा समाज खूप भोळा आहे. 

जरांगेंच्या अनेकांशी गुप्त मीटिंग

23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) हा नाटकी माणूस आहे. त्याचा मिटिंग रात्री होतात. वाशीला आंदोलल पोहचल. त्या रात्री पुन्हा गुप्त मिटिंग केल्या. अधिसूचनेत म्हटलं हे लागू सोळा तारखेला होईल. पण त्याची इच्छा होती, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं येऊन मला पाणी पाजावं. जरांगेला फक्त श्रेय हवं. जेसीबीतून फुलं हवीत कार्यक्रम हवेत. आरक्षण गरिबाला हवंच आहे. पण याचं काय? याला तर फक्त श्रेय हवं आहे, असं म्हणत अजय महाराज बरासकर यांनी जरांगेंच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Manoj Jarange

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Manoj Jarange
Manoj Jarange

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Manoj Jarange
Share the Post:
error: Content is protected !!