ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

BJP

Rajya Sabha Election 2024 : भाजपनं(BJP) महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपकडून याबाबत आज अधिकृत यादी जाहीर करण्यात आली.  

BJP candidate For Rajya sabha : भाजपनं(BJP) महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपकडून याबाबत आज अधिकृत यादी जाहीर करण्यात आली.   अशोक चव्हाण आणि अजीत गोपछडे दोन्ही नेते नांदेडमधील आहे. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा झाली होती. याबाबत आज भाजपकडून अधिकृत माहिती देण्यात आली.  

अजीत माधवराव गोपछडे हे मूळचे नांदेड येथील आहेत. लिंगायत ओबीसी असमार्या अजित गोपछडे यांनी संघ प्रचारक म्हणून काम केलेय. त्याशिवाय ते कारसेवक आहेत.  सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत. चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरुडमधून आमदारकीला उतरवल्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज होत्या. त्यांना आपली नाराजी अनेकदा बोलून दाखवली होती. आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय. 

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जांगांची निवडणूक होत आहे. या सहा जागा लढवण्याची महायुतीनं तयारी सुरु केली होती. अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे याला आणखी बळ मिळाले होते. मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास अडीच तास चर्चा झाली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एक एक जागा मिळणार होती. तर भाजपनं चौथ्या जागेसाठी तयारी सुरु केली होती. पण चर्चेनंतर सध्या मतांची जुळवाजुळव करणं कठीण असल्याचं दिसल्यामुळे भाजपनं चौथा उमेदवार देण्याचं टाळलं आहे. भाजपकडून चौथा उमेदवार न दिल्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

BJP
BJP

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

BJP
BJP

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

BJP
Share the Post:
error: Content is protected !!