CCTV Camera in school: शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा राज्यस्तरीय आढावा घेण्यासाठी सात सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून, शिक्षण आयुक्त त्याचे अध्यक्ष असतील. तर, सहसंचालक (प्रशासन), आयुक्त (शिक्षण) हे सदस्य सचिव असतील. शिक्षण विभागातील इतर अधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत. गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी अनुक्रमे महिन्यातून एकदा व दोन महिन्यांतून एकदा या उपाययोजनांचा आढावा घ्यावा. आवश्यकता असल्यास विद्यार्थी, पालकांचे जबाब नोंदवावे आणि त्याचा अहवाल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीस सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
CCTV Camera in school: बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला अखेर जाग आली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने बुधवारी नव्या उपाययोजना जाहीर केल्या. एका महिन्यात सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. अन्यथा अनुदान रोखण्यासह शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.
बदलापूर येथील शाळेमध्ये दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याने संतप्त पालक आणि नागरिकांनी मंगळवारी तब्बल १० तास रेल्वेसेवा रोखून धरली. त्यानंतर सरकारी पातळीवरून सूत्रे हलण्यास सुरुवात झाली असून, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नव्या उपाययोजनांची घोषणा शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.
शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यावर शालेय शिक्षण विभागाने भर दिला आहे. येत्या एक महिन्याच्या आत सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी पुरेशा प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीसीटीव्ही न लावणाऱ्या शाळांचे अनुदान रोखण्यासह शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था संचालित शाळांमध्ये लवकरात लवकर कॅमेरे लागतील याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर असेल.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.