ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Central Govt

Central Govt Cabinet Decision News : एकीकडे शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले असताना, दुसरीकडे केंद्र सरकारने ऊस खरेदीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Central Govt Cabinet Decision : पुढील पाच वर्षांसाठी डाळी, मका आणि कापूस पिकांची सरकारी संस्थांकडून किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने शेतकऱ्यांपुढे ठेवला. हा प्रस्ताव फेटाळत २३ पिकांना हमीभाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे. यातच आता ऊस खरेदीत वाढीव किंमत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने(Central Govt) घेतला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ऊस खरेदीच्या दरात ८ टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ऊस खरेदीचा दर प्रतिक्विंटल ३१५ रुपयांवरून आता ३४० रुपये करण्यात आला आहे. ऊसाच्या भावात प्रतिक्विंटल २५ रुपयांची वाढ देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मोदी सरकारने गेल्या १० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले आहे. २०१४ पूर्वी खते मिळण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागत होते. त्यावेळी ऊसाचा भाव रास्त नव्हता. दोन वर्षे वाट पाहावी लागली.

मोदी सरकारची या बाबतीतील कामगिरी उत्तम राहिली आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०१९-२० मध्ये ७५,८५४ कोटी रुपये मिळाले. २०२०-२१ मध्ये ९३,०११ कोटी रुपये मिळाले आहेत. २०२१-२२ मध्ये शेतकऱ्यांना १.२८ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. २०२२-२३ मध्ये १.९५ लाख कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे पैसे थेट त्याच्या खात्यात पाठवले गेले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.

Central Govt

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Central Govt
Central Govt

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Central Govt
Share the Post:
error: Content is protected !!