ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. अडीच महिने मी शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी अहमदनगर येथील सभेत केला आहे.

Chhagan Bhujbal : मी भाषण करतो तर विरोधी पक्षनेते मला राजीनामा मागतात. माझ्या सरकारमधील नेते सुद्धा बोलताय. काल एक जण काहीतरी बडबला की, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळच्या बाहेर काढा. 17 नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली. 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. अडीच महिने मी शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून केला आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही, पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही, पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन  छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी? असा थेट सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत त्यांनाच आरोपांच्या पिंजऱ्यात उभं केलं. 

Chhagan Bhujbal

जिथे ओबीसी लोक राहतात. तिथे दहशत निर्माण केली जात आहे. मारहाण केली जात आहे. लोक गाव सोडून जात आहेत. न्हावी समाजाच्या दुकानात जायचे नाही असे ठरविले. सर्व नाभिक समाजाने ठरवा एकही मराठा समाजाची कटिंग करायची नाही. फडणवीस साहेब तुमच्या खात्याचा भेदभाव चांगला नाही. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत सभा हे काय सुरू आहे. दाव पर सबकुछ लगा है, रुक नाही सकते, तूट सकते है, लेकिन झुक नही सकते, असे छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटले.  मराठा आमदारांना मत मिळणार नाही. म्हणून मराठा आमदार घाबरत आहेत. आमचे लोक रॅलीला येत नाही. पण, मदत ही करत नाही. निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये आरक्षणवर बोलल्या नाही मला वाईट वाटले. मराठा समाजाच्या नेत्यांची कीव येते. गावागावात ओबीसींना त्रास दिला जातो. तक्रार होत नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

360 कोटी रुपये खोटे रेकॉर्ड तयार करण्यासाठी देण्यात आले का? अशी विचारणा भुजबळ यांनी केली. कुणबी जिथं म्हटलं आहे त्या अक्षरात बदल आहे, त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही, असे मुख्याध्यापकचं पत्र आहे. कोणाशी लग्न केलं तरी तुम्ही आरक्षण पात्र ठरणार नाही असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे. खोटी वंशावळ जोडण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.

Chhagan Bhujbal

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Chhagan Bhujbal
Share the Post:
error: Content is protected !!