ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

crime

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : शहरातील सातारा परिसरात असलेल्या फ्लॅटमध्ये महिलांकडून वैश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दाम्पत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.(Crime News)

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : वेश्याव्यवसाय प्रकरणी मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) पोलिसांकडून धडक कारवाया होत असतानाच, आता पुन्हा एकदा शहरातील सातारा परिसरात अशीच कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सातारा परिसरात असलेल्या फ्लॅटमध्ये महिलांकडून वैश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दाम्पत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे मुलगी, जावयाच्या मदतीने सासूचं हा सेक्स रॅकेट चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. डीसीपी नवनीत कॉवत (DCP Navneet Kanwat) यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, शरद संजय साबळे (वय 29 वर्ष), रोहिणी शरद साबळे (दोघेही रा. मूळ, नवेगाव, जळगाव, ह. मु. सी.आर. रेसिडेन्सी, उमा गोपालनगर, सातारा परिसर) आणि माधुरी सुरेश थोरात (रा. विटखेडा) अशी आरोपींचे नावं आहेत. (Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिमंडळ दोनचे उपायुक्त नवनीत कॉवत यांना सातारा परिसरात सीआर रेसिडेन्सी येथील फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक आयुक्त रणजित पाटील यांना एक पथक नेमून कारवाईच्या सूचना दिल्या. मात्र, वेश्याव्यवसाय सुरु असल्याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी सुरवातीला डमी ग्राहक पाठविले. त्यानुसार सीआर रेसिडेन्सीमधील फ्लॅट क्रमांक 3 येथे डमी ग्राहक गेला. त्याने आत जाऊन महिला असल्याचे दिसताच पथकाला इशारा केला. त्यानंतर लगेचच पथकाने छापा मारला. 

पोलिसांनी छापा मारताच साबळे दाम्पत्य सोफ्यावर बसलेले होते. तर आत बेडरुमध्ये डमी ग्राहक आणि महिला अर्धनग्न होते. महिलेची विचारपूस केली तेव्हा तिने मला आर्थिक अडचण असल्याने एकासोबत शारीरिक संबंध ठेल्यानंतर पाचशे रुपये साबळे देणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी साबळेंची चौकशी केली तेव्हा त्याने त्याची नातेवाईक माधुरी थोरात हिच्या घरी वेश्या व्यवसायासाठी आणखी महिला असल्याचे सांगून ग्राहकांच्या मागणीनुसार ती महिला पुरवीत असल्याचे सांगितले. पथकाने विटखेडा येथे माधुरीच्या घरी छापा मारला. तिथे चार महिला आढळून आल्या. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक करून पाच महिलांची सुटका केली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा परिसरात सीआर रेसिडेन्सी येथील फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी एक डमी ग्राहक फ्लॅटमध्ये पाठवला. डमी ग्राहक आतमध्ये जाताच त्याने सुरवातीला वेश्याव्यवसाय सुरु असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर त्याने आपल्या मोबाईलवरून पथकाला ‘हाय’ असा मॅसेज पाठवून इशारा दिला आणि त्यानंतर पथकाने थेट छापा टाकत कारवाई केली.  ही कारवाई पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी, सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले, उपनिरीक्षक विनोद अबुज, सुरेश जारवाल, जमादार शोन पवार, संदीप क्षीरसागर, श्रीकांत काळे, योगेश गुप्ता, सागर पांढरे, दीपक शिंदे, सुनीता गुमलाडू, कवाळे, भावे यांनी केली. 

crime
crime

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

crime
crime

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

crime
Share the Post:
error: Content is protected !!