ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

crime

Crime News : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ यावरून हिणवले म्हणून तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी पोलिसांत गरुडझेप अकॅडमीच्या संचालकासह एकूण पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या तरुणीने अकॅडमीच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला होता. मात्र, अकॅडमीत आत्महत्या करणाऱ्या तरुणीने वेळेत पैसे न भरल्यामुळे तिला इतर मुलींसमोर अपमानास्पद वागणूक देऊन, ‘तू काळी आहेस,’ असे म्हणत अकॅडमीच्या संचालकाने हिणवले होते. हा अपमान सहन न झाल्यानेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांत गरुडझेप अकॅडमीच्या (Garud Zep Career Academy) संचालकासह एकूण पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  लीना पाटील (वय 19 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.(Crime News)

लीना पाटीलच्या वडिलांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “पोलीस व सैन्य दलात भरती होऊन सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून त्यांची मुलगी लीना पाटीलने दीड वर्षापूर्वी बजाजनगर येथील गरुड झेप अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. ज्यासाठी त्यांनी तीन टप्प्यात एकूण 1 लाख 20 हजार रुपये भरले होते. तसेच मेससाठी 4500 प्रती महिना भरत होते. कधीकधी मेसचे पैसे भरण्यासाठी उशीर होत होता. पैसे भरण्यासाठी उशीर झाल्यास नाश्ता दिला जात नाही आणि निलेश सोनावणे सर अपमानास्पद वागणूक देऊन इतर मुलांसमोर अपमान करत असल्याचं लीना आपल्या वडीलांना फोन करून सांगायची. तसेच जेवण देखील दिले जात नव्हते. मात्र, निलेश सोनवणे यांनी प्रशिक्षण झाल्यावर नोकरी लावून देण्याची हमी दिल्याने थोडा त्रास होईल असे म्हणून लीनाचे वडील मुलीला धीर द्यायचे,” असे तक्रारीत म्हटले आहे. 

मेसच्या पैश्यासाठी गरुडझेप अकॅडमीचा संचालक निलेश सोनवणे सतत लीनासह इतर मुलींचा देखील अपमान करायचा. अनेकदा नाश्ता आणि जेवण न देता अपमान करायचा. विशेष म्हणजे लीनाला सर्वांच्या समोर ‘ये काळे’  म्हणून हाक मारायचा. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचा नीलाने एकदा थेट निलेश सोनवणेला सांगितले होते. त्यावर, ये काळे तू मला शकवू नको, इतकं माय बापाचं वाटते तर जीव दे, तुझी लायकी तरी आहे का नोकरीवर लागायची, मी हमी घेतली आहे ना, लावेल तुला नोकरी, नाहीतर तुला काय करायचे ते कर, असे निलेश सोनवणे म्हणाला होता, असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

Crime
Crime

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime
Crime

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime
Share the Post:
error: Content is protected !!