ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime

Crime News :  शुक्रवारच्या मध्यरात्री येथे एका खासगी डॉक्टरवर प्राणघातक हल्ला झाला आहे,  पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळेस ही घटना घडली आहे.(Crime)

Crime News : नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारच्या मध्यरात्री येथे एका खासगी डॉक्टरवर प्राणघातक हल्ला झाला आहे, पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटलमध्ये (Suyog Hospital) रात्रीच्या वेळेस ही घटना घडली आहे. हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभागातच डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून हल्लेखोर मात्र फरार आहे. घटनेची माहिती समजताच पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

यापूर्वी 2022 मध्ये सुद्धा अशा प्रकारची घटना समोर आली होती. नाशिकमध्ये प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ अशी ओळख असलेल्या डॉक्टर प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली होती. डॉक्टर प्राची पवार यांच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका महिला डॉक्टरवर हल्ल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली होती. एकाच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला केला होता, ज्यात महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिसांकडून वॉर्डबॉय अनिकेत डोंगरेला अटक करण्यात आली होती. 

Crime

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime
Crime

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime
Share the Post:
error: Content is protected !!