ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime News
fraud stamp showing crime concept with copyspace

Crime News : अनोळखी नंबरवरून फोनद्बारे सीआयडीकडून बोलत असल्याचे भासवून सांगलीतील एका डॉक्टरांची १९ लाखाला ऑनलाईन लूट(Fraud) करण्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे

Crime News : अनोळखी नंबरवरून फोनद्बारे सीआयडीकडून बोलत असल्याचे भासवून सांगलीतील एका डॉक्टरांची १९ लाखाला ऑनलाईन लूट करण्याचा प्रकार घडल्याची माहिती रविवारी मिळाली. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, डॉ. निकेत शहा यांना दि. ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान दोन वेगवेगळ्या नंबरच्या भ्रमणध्वनीवरून अज्ञाताने संपर्क साधला. तुम्ही चीनला पाठविलेल्या कुरियरमध्ये १० बनावट पारपत्र, व्हीसा, लॅपटॉप व चीनचे चलन आहे. हे सर्व बेकायदेशीर असून तुमच्या भ्रमणध्वनीवर स्काईप अ‍ॅप घेण्यास भाग पाडले. या अ‍ॅपद्बारे बँक खात्याची माहिती मिळवली.

यानंतर अज्ञाताने अंधेरी पोलीस ठाणे व मुंबई सीआयडीकडून चौकशी केली जाईल असे सांगत सीआयडीच्या नावाने बँक खात्यावरील काही रक्कम पंजाब नॅशनल व इंडिसंड बँकेच्या खात्यावर वर्ग करून घेतले. तर काही रक्कम आरटीजीएस करण्यास भाग पाडले. अर्ध्या तासात पडताळणी करून पैसे परत करण्यात येतील असे सांगून १९ लाख ७ हजार रूपयांचा गंडा घातला आहे.

Crime
Crime

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime
Crime

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime
Share the Post:
error: Content is protected !!