ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime

Crime News : वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून एका अल्पवयीन मुलीला 15 दिवस डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय (Pune rape) करून घेतल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

Crime News : पुण्यात गुन्हेगारी वाढत असताना आणि रोज लैंगिक छळाच्या (Pune Crime News) घटना ताज्या असताना पुण्याला हादरवणारं कृत्य पुण्यातील एका दाम्पत्याने केलं आहे. वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून एका अल्पवयीन मुलीला 15 दिवस डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय (Pune rape) करून घेतल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी पती-पत्नीला अटक केली आहे.

आरोपी असलेल्या पती-पत्नीक़डून मुलीच्या वडिलांनी आजारपणासाठी पैसे घेतले होते. साधारण 30 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, त्यांना पैसे परत करता आले नाहीत. याचा काटा काढण्यासाठी आरोपी पती पत्नीने आघोरी प्रकार केला. त्याआरोपींनी मुलीला जबरदस्तीने पळवून नेत तिला के.के.मार्केट येथील एका लॉजमध्ये 10 ते 15 दिवस डांबून ठेवलं. त्यानंतर आरोपीने मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हा सगळा प्रकार आरोपीच्या पत्नीला माहिती असून सुद्धा मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

‘माझे पैसे दे, नाही दिले तर कुठूनही वसूल करुन दे, तुला सोडणार नाही’ अशी दमदाटी केली. त्यानंतर मात्र या आरोपीने आपली हद्द पार केली. लॉजवर राहायला येणाऱ्या ग्राहकाकडून पैसे घेवून वेश्याव्यवसाय करायला भाग पाडला. लॉजमध्ये आलेल्या प्रत्येक ग्राहकाला त्याने विचारणा केली आणि ज्यांनी होकार दिला त्यांच्याकडून पैसे घेत थेट मुलीच्या खोलीत पाठवून अत्याचार करायला सांगितला. 

याप्रकरणी एका दाम्पत्यावर भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) पोक्सो (Pocso Act) आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेला अटक केली आहे. तर आरोपी पती फरार झाला आहे. पुनम आकाश माने  आणि पती आकाश सुरेश माने अशी आरोपींची नाव आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2023 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याची घटना पहिल्यांदाच पुढे आली आहे. या दोघांनी केलेल्या या कृत्यानं पुणे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

crime
crime

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

crime
crime

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

crime
Share the Post:
error: Content is protected !!