ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime

Crime News : भिक्षेकरी बाबाला भिक्षा न दिल्याच्या रागातून संतप्त झालेल्या बाबाने एक महिलेवर त्रिशूळाने हल्ला केला आहे.

Crime News : भिक्षेकरी बाबाला भिक्षा न दिल्याच्या रागातून संतप्त झालेल्या बाबाने एक महिलेवर त्रिशूळने प्राणघातक हल्ला (Crime) केला आहे. चिखलदरा तालुक्यातील वस्तापुर गावातून हि धक्कादायक बातमी पुढे आली आहे. ठकीबाई सोनूजी हेकडे (60) असे या वृद्ध महिलेचे नाव असून त्यांच्या पोटावर हा त्रिशूळने वार करण्यात आला आहे. ‘

या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटना घडल्यानंतर ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली असता, गावकरी एकत्र गोळा झालेत आणि गावातील मुख्य चौकातील इलेक्ट्रिक खांबाला  या भिक्षेकरी बाबाला बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या बाबाला अटक करत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

 

 चिखलदरा तालुक्यातील वस्तापूर या गावात रविवारच्या पहाटेपासून उत्सव, भजनकीर्तन अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, दुपारपर्यंत गावात सर्व गावकरी आणि भक्तगण श्रीसंत गजानन महाराजांच्या कार्यक्रमात व्यस्त होते. असे असतांना, नेमके याच वेळेत दुपारी तीन वाजताच्या सुमारास एक अज्ञात भिक्षेकरी बाबा हातात त्रिशुळ आणि बगलेत भलेमोठे गाठोडे घेऊन गावात भिक्षा मागत होता. दरम्यान, भिक्षा मागत असताना गावातील सोनूजी हेकडे यांच्या घरी हा बाबा पोहोचला आणि त्यांने भिक्षेची तसेच पैशाची मागणी केली. त्यानंतर घरातील ठकीबाई हेकडे यांनी बाबाला भिक्षा दिली. मात्र, दिलेल्या भिक्षेत पैसे न दिल्यामुळे बाबाचे समाधान झाले नाही. त्यानंतर बाबाने वयोवृद्ध ठकीबाई यांना बळजबरीने पैश्यांची मागणी केली. मात्र त्यांनी नकार देताच या बाबाने त्यांच्या सोबत वाद घातला.

त्यानंतर या वादातून संतप्त झालेल्या भिक्षेकरी बाबाने आपल्या जवळ असलेल्या त्रिशूलने महिलेच्या पोटावर वार करून त्यांना जखमी केले. यात ठकीबाई यांच्या पोटावर त्रिशूळचा वार केल्याने त्या जखमी झाल्या. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरात जमलेल्या नागरिकांनी या महिलेला तत्काळ जवळील आरोग्य केंद्रात नेऊन उपचार सुरू केले. त्यानंतर नागरिकांनी या भिक्षेकरी बाबाचा शोध घेऊन त्याला शोधून काढले आणि गावातील मुख्य चौकात असलेल्या खांबाला कापडाच्या साह्याने बांधून ठेवले. कालांतराने ही बाब पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बाबाला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास चिखलदरा पोलीस करत आहेत. 

Crime

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime
Crime

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime
Share the Post:
error: Content is protected !!